माझी ब्लॉग सूची

शनिवार, एप्रिल १४, २०१२

माझी"जालिय"मुशाफिरी


 आम्ही जेंव्हा इंदोरात वास्तव्याला होतो.तेंव्हा मला बराच रिकामा वेळ असायचा. त्याच दरम्यानच्या काळात अभिनय पण वेब साठीकाम करायला लागल्याने घरात अनायसा नेटचा वापर सुरु झाला. आणी माझ्या संगणक साक्षरतेला वरच्या वर्गात जायला अनुमती मिळाली. तेंव्हापासुन सुरु झालेल्या या मुशाफिरीची ही कथा आहे.नेट्वर माझ्या मेल आयडी ने सुरु झालेला हा प्रवास हळुहळु ऑर्कुट्कडे कसा सरकु लागला हे कळले नाही. त्यावेळी रोज दोनतीन तास ह्या साईट्वर वेळ जायला लागल्यावर अपराधल्यासारखे व्हायचे खरे पण मन मात्र त्याकडे सारखे ओढ घेउ लागायचे.मग मात्र आपण ह्याचे ऍडिक्ट होतो कि काय असे वाटायला लागले.त्यावर चर्चेअंती असाही तोडगा निघाला की नेटवर अजुन काही उपयुक्त सापडते का याचा जरा धांडोळा घ्यावा. त्यावर वेगवेगळ्या कम्युनिटी सापडल्या. आपल्यासारख्या समविचारी लोकांच्या संपर्कात आपणच वेगळे नाही हे ही कळायला लागले.नकारात्मक,त्रास देणार्‍या विचारांचा हळुहळु निचरा व्हायला लागला. नवे वाचन होउ लागले.विवीध प्रांतातल्या लोकांच्या या जालिय भेटींनी त्या त्या प्रांताची वैशिष्ट्य समजली. नजर विस्तारली विचार व्यापक झाले. आपल्या दु:खापेक्षा जगात फार मोठे दु:खी आहेत याची जाण झाली अन माणुस म्हणुन मी समृद्ध झाले. याच दरम्यान मी हा ब्लॉग सुरु केला अन मनातल्या विचारप्रवाहाला इथे वाट मिळाली.मिसळपाव मनोगत उपक्रम यासारख्या सोशल नेटवर्किंग साईटवर वेगवेगळ्या लोकांच्या, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांच्या विचारांचे आदानप्रदान झाल्याने एकाच विचाराचे अनेक पैलु समोर आले.                                                        जालिय भाषा                                                                              फेसबुक ला चेहरापुस्तक असे नामकरण केले. त्याचेही संक्षिप्त रुप होउन चेपु असे नाव जालावर रुढ झाले.संकेतस्थळ हे नाव ऐकल्यावर संदीप खरेचे गाणे न सुचता जालीय साईटच आठवतात हे या नावाचे यश आहे. जसजशी मी जास्त वेळ देत गेले तसतसे नवनवीन शोध लागत गेले.व्य.नी,खरड,कट्टा हे शब्द मराठी संकेतस्थळावर नंतरनंतर सवयीचे हौ लागले. शुद्ध मराठीतील काही हद्दपार झालेल्या शब्दांना या जलिय भाषेने पुनरुज्जीवन दिले.यावर लिहणारे विविध वयोगटातील सदस्य असल्याने जुन्या नव्याचा संगम झाला अन आमच्या माहितीत भरच पडली. डकवणे हा शब्द किंवा लिंका,लिंकाळ्या सारख्याच धाटणीचे वाटत असले तरी डकवणे हा मराठी तर लिंका हा इंग्रजी लिंक्स चा मराठी अपभ्रंश आहे. येथे लिहताना काही संकेतस्थळावर मराठी भाषा शुध्दतेचा फारसा विचार केला जात नाही हे चांगले की वाईट या तपशिलात न जाता माझ्यासारख्या सामान्यजनाला मनातले भाव कागदावर उतरवण्याएवजी बॉग वर पोस्ट करणे सोपे झाले.परवलीचा शब्द,विरोप,गमन असे फार छान शब्द यामुळे प्रचलित झाले.ह.ह.पु.वा,ह.घ्या यासारख्या शब्दांच्या लघुरुपाची गंमत कळण्यासाठी या महाजालात डुबकी माराच महाराजा! 
 नेटवरचे सवंगडी 
 नेट्वर वावरताना काही स्वनामाने तर काही टोपणनावाने वावरताना दिसतात. त्यानावांचेही संक्षिप्तरुप झालेले आहे.परिकथेतील राजकुमार (पर्‍या),पाषाणभेद(यांचेही काही जालिय सदस्यांनी दगडफोड्या असे नामकरण केले आहे.) , मदनबाण,टारझन(टार्‍या),चुचु,धमाल मुलगा(धमु) अशी बरीच मोठी यादी आहे.काही त्यांच्या जालिय नावाने च इतके प्रसिद्ध आहेत की खर्‍या जगातल्या त्यांच्या नावापेक्षा या वर्च्युअल जगातल्या नावानेच ते ओलखले गेले तर ती अतीशयोक्ती ठरणार नाही. यातुन मला सगळे मिळाले तर याला आभासी म्हणण्याचा करंटेपणा मी कसा करु? कोणतीही गोष्ट अती केली तर ती वाईट हे मान्य पण आपल्या हरवलेल्या आठवणींना उजाळा देणारे हे "नेटीय"नेट्केच वेचा म्हणजे झाले.

गुरुवार, एप्रिल १२, २०१२


                 वाचावे नेटके 

 

 हा तेल नावाचा इतिहास आहे,एका तेलियाने ही गिरीश कुबेरांची दोन्ही पुस्तके एकदम हॉट विषयावरील टॉप माहिती देणारी पुस्तके आहेत.ज्याला जागतीक अर्थकारण जाणुन घ्यायचे आहे त्यांच्यासाठीतर ही पुस्तके अगदी "मस्टच" आहेत. असेच एक बदलता भारत हे भानु काळे यांचे पुस्तकही भारतातल्या सर्वच क्षेत्रातल्या बदलावर भाष्य करणारे आहे. उदय निरगुदकरांचे लोकल ग्लोबल असे वर्तमानपत्रातील सदरांचेच संकल अन असलेले पुस्तकही चालु घडामोडींवर भाष्य करणारे,योग्य माहिती देणारे आहे. सदरांचेच पुस्तक झालेल्या सदरात सोनाली कुलकर्णी चे सो-कुल आहे.तर भटकंती हे मिलिंद गुणाजी यांचे पुस्तक त्यांच्या टी.व्ही. शो च्या चित्रमय सफरीचेच चित्रण करते. सध्या दिव्य मराठीत सुरु असलेल्या व्हॉट ऍन आयडिया या अभिजीत कुलकर्‍णी यांच्या सदराचे भविष्यात पुस्तक व्हायला काहिच हरकत नाही. पुस्तक वाचण्याबरोबरच ते पाहणे ही मौजेचे असते महाराजा! याचीच अनुभुती देणारे "पहावा विठ्ठ्ल" व "महाराष्ट्र देशा" हे ही दोन डोळ्यांना मेजवानी देणारी कॉफी टेबल फॉरमॅट पुस्तके ही उध्दव ठाकरे यांनी दिलेली अनोखी भेट आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष हे पुस्तक ही पत्रकारितेच्या विद्यार्थींसाठी,विशेषत: पॉलिटिकल बीट सांभाळणार्‍या सर्वच पत्रकारांसाठी चांगले माहितीपर ठरेल. ही यादी तशी विस्तारणारी असल्याने येथे पुर्णविरामा ऐवजी स्वल्पविराम.

गुरुवार, एप्रिल ०५, २०१२

मानसिकतेशी संबंधीत..

सेंटर फॉर ऍडिक्टशन ऍण्ड मेंट्ल हेल्थ(सी ए एम एच) ने  कॅनडा येथील अल्बर्टा येथे मोठ्या समुहाच्या दिर्घकाळ नोकरी केलेल्या अन आता नुकतेच नोकरीस लागलेल्या अशा दोन गटाच्या  अभ्यासातुन हाती आलेल्या नव्या निष्कर्षानुसार,नैराश्येसाठी उपचार घेत असणार्‍या रुग्णांपैकी जे रुग्ण उपचार सुरु असताना कार्यमग्न असतात त्यांच्यात जास्त चांगले परिणाम दिसुन आले आहेत.  
ज्या कर्मचार्‍यांना नैराश्येने ग्रासले आहे असे लोक जास्त उत्पादकता दाखवु  शकत नाहीत. 
    पुर्वी केलेल्या अभ्यासानुसार नैराश्याचा परिणाम रुग्णाच्या बोलण्यावर, सामाजिक वावरावर,दैनंदिन कामकाजावर होताना दिसतो.असे मत सी ए एम एच चे मुख्य डॉ. कार्लिन देवा यांनी व्यक्त केले. देवा ह्या कार्यालयिन आरोग्य संशोधनाच्या प्रमुख आहेत.    
यात समाधानाची बाब अशी आहे की नैराश्यावरील उपचाराने लोकांच्या कार्यक्षमतेत कमालीचा फरक पडलेला दिसुन आला. उपचार न घेतलेल्यांच्या तुलनेत मध्यम उपचारक रुग्णांमध्ये अडिचपट कार्यक्षमता वाढल्याचे या प्रयोगाच्या निष्कर्षात दिसुन आले आहे.   
याच प्रमाणॆ योग्य उपचार घेतलेल्यांची कार्यक्षमता सातपट वाढल्याचे मतही त्या नोंदवतात.  
प्रयोगासाठी घेतलेल्या 3 हजार कामगारांपैकी साडेआठ ट्क्के  लोक नैराश्येचा अनुभव घेत होते. यांची संख्या 255 होती. 
ह्या उपचारांनी रुग्णाची कार्यालयीन कार्यगती सुधारत असली तरी नैराशेमुळे आलेल्या आजारात ही तितकीशी उपयोगी नाही 
"आम्हाला असे आढळुन आले आहे की तीव्र नैराश्येने ग्रासलेल्यांपैकी 57 टक़्क़े लोकांना उपचार मिळत नाहीत.आणी मध्यम नैराश्य असलेल्या 40 टक्के रुग्णानां अजुनही उपचाराविना रहावे लागते." असे मत देवा यांनी नोंदवले. 
 या आजाराविषयी आपल्याला आपल्या कामाच्या ठिकाणी मदत मिळु शकते याची माहितीच बर्‍याच जणांना नसल्याने  लोकांच्या म आनसिकतेवरही याचा परिणाम होतो असे मत  देवी यांनी व्यक्त केले. 
2. 

सर्वाधिक खोटे बोलण्याचा महिना जानेवारी. - एक निष्कर्ष. 
 
 
नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार,वर्षातील इतर कुठल्याही महिन्यापेक्षा लोक जानेवारीत जास्त खोटे बोलतात असे समोर आले आहे.   
यातील बहुतेकजण आपल्या नवीनवर्षाच्या समारंभाची अतिरंजीत वर्णने करतील तर काही आपल्याला किती गिफ्ट मिळाले याची फुशारकी मिरवतील. तर काही आपल्या डायेट प्लान च्या कटॆकोर नियोजनाच्या बढाया मारतील तर काही 217 पोर्कीज रिचवल्याच्याही बाता करतील(आपल्याकडील सर्वे असता तर किती वडापाव खाल्ले याची माहिती असली असती.)  
डेली ऎक्सप्रेस च्या रिपोर्टनुसार वर्षाअखेरच्या पार्टीत किती प्याले रिचवले हे सांगण्याचीही अहमहमिका लोकांमध्ये या महिन्यात लागत असेल हे नक्की!
"लाय टु मी" या टि.व्ही शो ने घेतलेल्या सर्वेनुसार ह्या महिन्यात,अर्ध्याहुन अधिक लोक थंडीचे खोटे कारण सांगुन फिरण्यापासुन तर आजाराचे कारण सांगुन दिवसाच्या कामापासुन सुटका करुन घेताना अढळले आहेत.   
 आपण जानेवारीत दिवसाला 7 वेळा,तर उर्वरीत वर्षभर दिवसातुन 4 वेळा खोटे बोलतो.असे पाहणीच्या निष्कर्षात आढळले आहे.   
पण दोन हजार व्यक्तींपैंकी अर्ध्याधिक लोकांनी आपले खोटे जानेवारीत वरचेवर पकडले गेल्याचे नमुद केले आहे.
लोकांच्या खोटेपणात पैसा हा वरच्या क्रमांकावर आहे.कारण नववर्षासाठी खर्च केलेल्यापैकी किती खर्च हा क्रेडिट कार्डावर तर किती रोखीने केला हे  खोटेच सांगणे(म्हणजेच उधार अन उसनवार किती अन ऋण काढुन सण किती हे गुलदस्त्यात ठेवणॆ.)  
पावटक्के लोक आपण सेलवर घालवलेल्या पैशाबद्द्ल,पाचजण नवीन वर्षस्वागताबद्दल खोटे बोलतात. आपण लै भारी हॉटॆलात  पार्टी केली म्हणणारे लोक मात्र घरात बसुन टि.व्ही बघत असतात. 
काहीजण समोरच्याला बरे वाटावे म्हणुन खोटे बोलतात.
देहबोलीतील मास्टर, जेम्स बोर्ग यांच्या म्हणण्यानुसार बहुतेक जणांना आपण सपशेल खोटे ओळखु  शकतो असा गाढ विश्वास   असला तरी हे खरे नाही.  



बालपणीचा काळ सुखाचा... लहानपण हा पोरखेळ नव्हे.... 
 
 
तुमचे लहानपण किती आनंदात गेले. हा प्रश्न साधा वाटत असला तरी ह्याचे उत्तर वाटते तितके सोपे नाही.   बहुतेक लोक ह्या विषयी उत्तरताना आपल्या आठवणींचा,आयुष्यात घडलेल्या गोष्टींचा धांडोळा घेतात.  त्यांच्या लहानपणी संपर्कात आलेली माणसे,घडलेल्या गोष्टी याचा संदर्भ ह्या बालपणींच्या आठवणीत येतो.    काही आठवणी सुखकर, काही उदासवाण्या काही भितीदायक असतात.  
आपल्या बालपणीचे चित्र आपण अनुभवलेल्या सगळ्या बर्‍या वाईट घटनांचे सारच असते.मग त्या घटना  
बर्‍या वाईट दोन्ही पद्धतीच्या असतील.हे नक्की सांगता येत नाही की त्या लहाणपणीच्या आठवणी कितपत वास्तववादी याबाबत नक्की काही ठोस विधान करणे कठिण आहे.म्हणजे लहानपणी भितीदायक वातलेली बागुलबुवा प्रत्यक्षात ताई वा दादाच्या घाबरवण्यामुळे जास्त भितीदयक वाटलेला असतो. कारण त्या घटनांचा अर्थ आपण आपल्या त्यावेळच्या बुद्धीच्या कुवतीनुसार लावलेला असतो.अन तोच आपल्या मनावर कोरला गेलेला असतो.  बरेचदा आपल्या आजुबाजुच्या व्यक्तींनी सांगितल्या घटना,तेंव्हाचे तात्कालिन फोटो, वा सांगोपांगीचा प्रभावही आपल्या लहानपणींच्या आठवणींवर झालेला आढळतो.  मोठ्यांच्या दृष्टीकोनातुन पाहिल्यास आपल्या लहानपणाचे वेगळेच पैलु समोर येतात.  उदाहरणार्थ लहान पणीच्या घटना,कोणाचे  चिडवणे, मित्राने लावलेल्या शेंड्या , एखाद्याचे प्रेम राग ह्या लहानपणीच्या अनुभवाचा परिणाम सध्याच्या नात्यावर होतो.
 नुकत्याच केलेल्या निरिक्षणातुन असे समोर आले आहे की, बालपण आनंदात घालवलेल्या मुलांचे सामाजिक भान,स्व-विकास, व आत्ताची वागणुक ही जास्त योग्य असते,चांगली असते.बालपणीच्या विचित्र घटनांचा पगडा असणार्‍या मुलांना त्यांच्या प्रत्येक नाते संबंधात अडचणी येतात.स्वमग्नता व ताण अशा लोकांमध्ये जास्त बघायला मिळतो.  
 मुलांची अती काळजीही त्यांच्या सशक्त मानसिक वाढीसाठी नुकसानकारकच आहे.याबाबत पालकांना पुस्तके,मासिकातील लेख, टि.व्ही. संकेतस्थळ आदी ठिकाणाहुन विपुल माहिती मिळु शकते. आपल्या पाल्याने अभ्यास वाचन क्राफ्ट यासारख्या गोष्टींवर किती वेळ घालवावा यावर पालकांची नेहमी द्विधा मनस्थिती असते. कोणती खेळणी, खेळ टि.व्ही वरील कार्यक्रम, व्यायाम, संगीत,किंवा रोल् मॉडेल मुलांसाठी योग्य आहे, त्यांना फायदेशीर काय आहे? कोणते बघण्यालायक आहेत? व कोणते धोकादायक आहेत?याबाबत लोक कायम गोंधळलेले असतात. 
   मुलाच्या लक्षात राहावा असा अविस्मरणीय वाढदिवस साजरा करणे ही आपली जबाबदारी आहे.नव्हे तर त्याच्या बालपणीच्या सुखद आठवणीसाठी ते गरजेचेही आहे.पण त्यावेळी महागडे गिफ्ट दिले पाहिजे हे गरजेचे नाही. बाबानी लहानपणी दाखवलेली जुगनुंची(काजव्यांची) माळ मुलाला समृद्ध् करुन जाते.  
  नुकत्याच केलेल्या पाहणीत हाती आलेल्या निष्कर्षानुसार, आपल्या लहानपणीच्या मनावर कोरलेल्या घटना आपल्या आत्ताच्या वागणुकीचा आरसाच असतात.आपल्या घरातील लोकांचे एकमेकांशी असलेले संबंध, भावभावनांची देवाणघेवाण, आपल्या पद्धती,रीवाज, परंपरा, एकमेकांची गुपिते,घरच्या मंडळींचे एकमेकांशी असलेले सशक्त नातेच मुलाचे बालपण समृद्ध करत असते.    मुल व्हिडिओ गेम खेळण्यात,टि.व्ही बघण्यात किती वेळ घालवते,ते किती चांगले संगीत ऐकते , कोणती चित्रे काढते यापेक्षाही ते कशा वातावरणात वाढते यावरच बालपणीच्या सुखद आठवणी अवलंबुन असतात.     
  पालक मात्र मुलांना लहानपणी आलेल्या विचित्र अनुभवावर चर्चा करताना दिसतात त्यापेक्षा  सध्या त्यांना (मुलांना) भेडसावणार्‍या समस्येचा विचार पहिल्यांदा अन प्राधान्याने  व्हायला हवा.   तीव्र शारिरीक आजार,शालेय प्रगतीत येणारे अडथळे यांच्यावर उपचारासाठी लहानपणीच्या चांगल्या आठवणींची मदत नाही घेता येत. मात्र मुलांमधील धसमुसळेपणा,लोकांकडुन नाकारले गेल्याची जाणीव यासारख्या समस्या सोडवताना बालपणाची नक्कीच मदत होते.  मुलांना प्रत्येक धोक्यापासुन वाचवणे शक्य नसले तरी त्यांची दखल घेतल्याने स्वभावातील आश्वसक बदल नाक्कीच घडवता येतो.  प्रीय व्यक्तींचा विरह, एकटेपणा यात कोसळणारा तरुण हा त्याच्या लहानपणीच्या दु:खी मानसिकतेचे प्रतिक आहे.  आपल्या  बाह्यरुपाविषयी नाखुश, वजन कमी करण्याचा प्रयत्न,वारंवार केशरचनेतील बदल हे अस्थिर मानसिकतेतुन येते.
   पालकांनी मुलाच्या शैक्षणीक, क्रिडा तसेच सांगीतीक व कलेच्या प्रगतीत नक्कीच लक्ष घालायला हवे.  एखाद्या घटनेबद्दल पाल्य कसा विचार करतो यावरच त्या मुलांच्या बालपणीच्या सुखद आठवणी अवलंबुन असतात.  मुलाला आपल्या विजयाचा अनुभव नक्की मिळाला पाहिजे. त्याला एखाद्या घटनेत आनंद घेता यायला हवा.यशही सहज स्विकारता यायला हवे.
  त्याच्या  बालपणीच्या सगळ्याच स्मृती आनंददायी असतील असे नाही  पण तात्कालिन लोकांचे वागणे हे त्या घटनांपेक्षा जास्त परिणामकारक ठरते. आपल्याला बक्षीस नाही मिळाले तरी आई बाबा त्यावेळी कसे वागले हे त्याच्या अंतरमनावर  कोरले जाते. मुलांची त्यावेळची कमतरता काही न मिळाल्याची जाणीव  पालकांएव्हढी  जाणवत नाही.म्हणजेच आपण बंड्याला तो महागडा गेम घेउन दिला नाही याचे शल्य मुलापेक्षा बंड्याच्या आई बाबांनाच जास्त असते. पालकांचा मुलाप्रती असलेला  प्रेमळ व्यवहार बालपण रम्य करण्यास मदत करतो.  आपण मुलांना किती वस्तु घेउन दिल्या यावर त्यांचा आनंद अवलंबुन नसुन आपण त्याबरोबर कसा अन किती वेळ घालवला हे जास्त महत्वाचे  असते.

प्रगती अभियान


विषय:प्रगती अभियानाविषयी माहिती
            हेतु :माहितीच्या अधिकाराचा योग्य वापर कसा करावा व आपल्या अधिकार क्षेत्राचा आवाका जाणुन घेण्यासाठी प्रगती अभियान ह्या संस्थेला प्रथमवर्ष पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली.
 प्रगती अभियान या संस्थेच्या संचालिका अश्विनी कुलकर्णी यांनी प्रगती अभियानाविषयी माहिती दिली.यात सामान्य नागरिकाला असणारे अधिकार आणी त्यांचा अवलंब करताना त्यांना येणार्‍या अडचणींविषयी विस्तृत चर्चा केली.
            प्रगती अभियान म्हणजे काय?
            प्रगती अभियान ही संस्था गेल्या 5 वर्षांपासुन नाशिक व आसपासच्या परिसरातील गरजु व दुर्लक्षीत व्यक्तींसाठी कार्य करत असते.
संस्थेचे अनेक लहानमोठे कार्यकर्ते असुन गरजु आणि दुर्लक्षीत घटकांसाठी ते कार्य करत आहेत. राज्यशासव केंद्रशासनाच्या निरनिराळ्या कल्याणकारी योजना सामान्य व आर्थिक दुर्बल घटकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ही संस्था करत असते.नरेगा(NAREGA)रोहयो,शेतीच्या विविध योजना,धान्य वितरण दुकानातील मालाचे योग्य वितरण,हरियाली योजना, या सारख्या योजनांवर सध्या प्रगती अभियान काम करत असल्याची माहिती कुलकर्णी यांनी दिली.    
            वर उल्लेखलेल्या योजनांचा लाभ मिळण्यास अडचणी येणार्‍या लोकांना आपण माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातुन मदत अथवा दाद कशी मागता येइल यासाठी माहिती व मार्गदर्शन करण्याचे काम आपली संस्था करत असल्याची माहिती कुलकर्णी यांनी यावेळी सांगितली.आजवर राबवलेल्या अनेक योजनांबद्दलही त्यांनी सांगीतले.डाळिंब उत्पादनासाठी शेतकर्‍यांना मिळणारी सुविधा,रेशनचे सामान येळेवर मिळण्यासाठी केलेली मदत याचाही उल्लेख त्यांनी केला.
            प्रगती ही जरी एक संस्था असली तरी शासकिय योजना गरजवंतांना पोहोचवणे हा त्यांचा प्रमुख उद्देश आहे.यासाठी माहितीच्या अधिकाराचा योग्य व पुरेपुर वापर त्यांनी केला.सध्या गरिबी निर्मुलन शेतीच्या योजनांमधील समस्यांवर उपाय शोधण्याचे काम प्रगती अभियान करत आहे.
            RTI चा अर्ज कसा,कुठे व कधी करावा,त्यासाठी लागणारे पुरावे,अर्ज याविषयीची माहिती पत्रकांद्वारे,पुस्तकाद्वारे,णि बैठकींद्वारे देण्याचे काम ही संस्था करते.रोहये,बांधकाम विभाग,नरेगा ग्रामिण योजना यासारख्या अनेक लोकोपयोगी योजनांविषयी माहिती व जनजागृतीचे कामही ह्या संस्थेद्वारे केलेजाते. या अभियानाविषयी माहिती देण्याचे काम नितीन परांजपे सर व एच.पी.टी. महाविद्यालयातील पत्रकारीता विभागाचे प्राध्यापक रमेश शेजवळ सरांनी केले.
              
            गरजवान व्यक्तींसाठी सरकार दरबारी असलेली अडकलेली प्रकरणे सोडवण्यासाठी आत्तापर्यंत कुप लोकांना प्रगती अभियानने मदत केली आहे. अडचणी सोडवताना आलेले कडुगोड अनुभवही त्यांनी यावेळी सांगितले.
            सध्या "रोजगार हमी योजना"अर्थात रोहयो मध्ये सर्वात  जास्त भ्रष्टाचार होत आहे.या योजनेंतर्गत "मागेल त्याला मागेल तितके काम"या सुत्रानुसार कार्यवाटप करुन लोकांना दिवसाला 127 रुपये मोबदला दिला जातो. यात अकुशल कामगारांना संघटित करणे,त्यांना कामाचे वातप करणे,कामाचा योग्य मोबदला देणे यांचा समावेश होतो.सर्व मुद्द्यावर आपण माहितीचा अधिकार वापरु शकतो.त्यांनी सांगितलेल्या अनुभवातुन माहितीच्या अधिकाराचे महत्व अधिक स्पष्ट झाले.
            सरकारी धान्य वितरण पध्दतीत कितपत पारदर्शकता आहे?यात कितपत पारदर्शकता राखता येईल यासाठी स्मार्टकार्ड योजना कशी राबवता येईल,त्याच्या उपयोगाने सर्व गरजुंना धान्यप्राप्ती वेळेवर  होईल.रेशनींग दुकानात वापरली जाणारी पध्द्त बदलुन स्मार्ट कार्ड वापरल्यास वेळेचा अपव्यय टाळुन सर्वांना योग्य व न्याय्य धान्यवितरण करता येईल. न्युयॉर्क मध्ये अशी योजना वापरली जात आहे.भारतातही छत्तीअस्गड राज्यात online ragister card" हि अभिनव कल्पना यशस्वीपणे सध्या कार्यरत आहे.महाराष्ट्रात अशा प्रकारची योजना आणणे गरजेचे आहे.रेशनिंग कृती समिती ही संस्था यासारख्या अडचणीवर गेल्या 25 वर्षांपासुन काम करत आहे.आपली लोकशाही बलाढ्य मोठी असली तरी तिला पुरक कायदे येथे घदले नाहित हि खंत आहे.
"प्रगती अभियानाचे कार्य मुख्यत: दारिद्र्यात खितपत पडलेल्या ह्या निरक्षर समाजाचा आर्थिक विकास लोकशाहीने घालुन दिलेल्या मर्यादांचे उल्लंघन न करता माहितीचा अधिकार वापरुन करणे होय"हेच संस्थेचे उद्दिष्ट आहे.
            "माहिती अधिकार कायदा "सामान्य माणसांसाठी एक अंकुश आहे ज्यामुळे सत्तेवरील घोटाळेबाजांना वचक बसवता येईल.यासाठी प्रगती अभियान सतत कार्यशील आहे.
विश्लेषण:वाढत्या महागाईपेक्षाही भयानक असणारा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी महितीच्या अधिकाराचा चांगला वापर करता येतो.विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आपण सरकारला सहकार्य करायला पाहिजे.
            ग्रामीण भागात राबवण्यात येणार्‍या योजनेतील भ्रष्टाचाराचे निवारण करण्यासाठी किंवा व्यक्ती (सरकारी) बद्दल माहिती मागवु शकतो.यासाठी 3 प्रकारचे अर्ज वापरले जातात. कोर्ट फी स्टॅम्प लाय्न आपण माहिती मागवु शकतो.ठरलेल्या विशिष्ट मुदतीत ती माहिती संबंधितांना देणे बंधनकारक असते.