माझी ब्लॉग सूची

Follow by Email

शुक्रवार, मे १३, २०१६

आज अभिचा वाढदिवस. सकाळपासून घातलेला बुरखा आता विरायला आला जशी रात्र झाली तशी.लहानपणापासूनच हा माझा प्रॉब्लेम आहेच जरा दुर्लक्षीत झाले की वाईट वाटायला लागते.काय करणार.आज अभि असता तर.....ह्या जरतरला काही अर्थ नाही हे कळतय पण ...... हा पण फार वाईट .....आहे मनोहर तरी.....अशी मनाची झालेली कातर अवस्था ...... हयातून कधीतरी बस्ट होण्याची भीती.... संध्याकाळपर्यंत मूड बरा होता.आता काय झाले न कळे .खूप काम पडले तरी राग येतो .नाही करू दिले तर डावलल्याची भावना .कसे व्हायचे माझे .बर आता मनाचे नखरे सांभाळायला नवरा ही नाही हक्काचा .असो.....
            आता वहीत तर हे रडगाणे रोज गातेच .आता जालिय रडगाणेही ही बया गाणार का काय असे तुम्हाला वाटणे स्वाभाविक आहे म्हणा .पण असे होऊ नये याची काळजी घायचा नक्की प्रयत्न करेन. 

गुरुवार, मे १२, २०१६

आणी तो क्षण आला ज्यासाठी मला आज वेळ मिळालाय.सगळं जमून आलय.आणी मी माझ्या ब्लॉग वरची धूळ झटकलीये .हातात लॅपटॉप आलाय पण काय आणी कस मांडू ते कळत नाहीये .ते लहान मूल नाहीका हरवलेले खेळणे परत मिळाल्यावर त्याला कसे काय करू आणी काय नको असे होतेय तसेच झालेय माझे.रोज लिहीनच असे नाही पण लिहीत रहायचा प्रयत्न तरी नक्कीच करीन.
      

रविवार, ऑगस्ट ११, २०१३