मुडी(हे माझ्यापेक्षा माझा नवरा जास्त चांगलं सांगेल)
जे मनात आले ते बोलुन टाकले.असे आहे माझे बघा.
कोणत्या गोष्टीने मी भारावुन जाईन हे सांगणे जरा कठीणच.
विश्वाच्या पसार्यातला एक साधा जीव असणारे आपण स्वत: विषयी केवढे ग्रह करुन जगतो नाही.
अनुभवातुन वाचनातुन तुमच्या सारख्यांच्या प्रतिक्रीयांतुन शिक्षण सतत चालु आहे.जे जे वाटले ते ते इथे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.
आज पहिल्यांदाच मी मिपावर एवढा मोठा प्रतिसाद दिलाय मनात धाकधुक आहेच कोण काय म्हणेल.अभिला काय वाटेल. त्याच्या बुध्दिवादी लेखांपुढे माझे लेखन ते काय. पण आता मी हळुह्ळु लिहायला सुरवात करणार आहे. बाकी काही नाही तरी टंकायचा सरव तरी होइल.
मी मुळची मिरजेची।आता नंतर नाशिकचेही वास्तव्य आहे.सध्या मुक्काम इंदोरात.फार टंकायची सवय नाही.त्यामुळे येथे रोज थोडे थोडे लिहणार.दैनंदिनीच म्हणा हवेतर,लिहायची आवड आहे ओ. पण कोण काय म्हणेल ही भिती. रोज जो काही थोडा वेळ मिळेल तेंव्हा ईथे येउन लिहायची भुक भागवणार.ही एक प्रकारची डायरीच आहे म्हणा ना!अगदी घरगुती बाईची डायरी म्हणा हवेतर.चांगले वाईट असा फरक न करता मनातल्या गोष्टी इथे उतरवणार आहे. पुलंनी म्हटल्याप्रमाणेच मी म्हणते की ही एका घरगुती बाईची वही आहे. माझ्या आयुष्यात आलेल्या अनुभवांचा माणसांचा धांडोळा मांडण्याचा हा एक प्रयत्न. कदाचीत तो माझ्या नजरेतुनही असेल. बघा आवडतोय का ते!