माझी ब्लॉग सूची

शनिवार, ऑक्टोबर २३, २०१०

आज "तुक्याची आवली" हे मंजुश्री गोखले लिखीत पुस्तक वाचत आहे.वाचताना वारंवार त्यातल्या बर्‍याच गोष्टी वाचताना तुकारामांवरचे पाहिलेले नाटक आठवते. त्यातले तुकारामांचे आवडीशी असलेले संवाद आठवतात. त्यातल्या तुक्याशी मी अभिला रिलेट करते.एकदम तडकाफडकी आमच्यातुन त्याला घेउन जाताना त्या देवाला आमचा जराही विचार आला नसेल का? त्याची गरज असणारे आम्ही पोरके झालो हे त्या देवाला कळले नसेल का? ती तुक्याची आवली मनाने तरी खंबीर होती पण माझ्या सारखीचे काय? आजच्या सुट्टीच्या दिवशीची त्याची कमी मला फार जाणवते आहे. संध्याकाळ घरी काढणे मला तरी अशक्य आहे असे म्हणणारा माझा अभि आता माझी प्रत्येक संध्याकाळ एकटीने काढायला मला एकटं सोडुन गेला. मुलगी हळुहळु मोठी होतेय तीच्या स्वप्नांची चौकट विस्तारते आहे. तीने स्वत:ची समजुत घातली आहे.सकाळी आयस्क़्रीम बघुन तीचे लकाकलेले डोळे मला जगण्याची आशा देउन गेले.माझासाठी नाही तए तिच्यातला ओलावा जपण्यासाठी मला उभे रहायचे आहे.माझी फिरण्याची हौस अभिने खुप भागवली आता लेकीला आवडते तसे मी वागायचे ठरवले आहे.लहानपणापासुन प्रेमाच्या स्पर्शाला आसुसलेली  मी अभिच्या प्रेमात पार न्हाउन गेले.तृप्त झाले ती इंदोरची मंतरलेली तीन वर्षे मी स्वत:ला कायम म्हणत होते की जगी सर्व सुखी असा कोण आहे हा प्रश्न रामदासांनी मला विचारला असता तर मी गर्वाने "मी" असे उत्तर दिले असते.अशी तीन वर्षातली अभिने  भरभरुन दिलेली प्रेमाची शिदोरी मला आयुष्यभर पुरवुन वापरायची आहे. मुलीच्या आयुष्याच्या चौकटीत रंग भरताना माझी ही अभिच्या अस्तित्वाखेरीच असणारी माझी चौकट, माझाबरोबर जपत तीच्या आनंदात मी रममाण व्हायला हवे.