माझी ब्लॉग सूची

Follow by Email

रविवार, जून २७, २०१०

आपल्याकडे कसे देशस्थ कोकणस्थ वगेरे भेद आहेत तसेच भेद इकडे निमाडी अन मालवी संस्कृतीतही दिसुन येतात. मला वाटायचे की हे फक्त आपल्यातच आहे कि काय? हे जसे इथल्या संस्कृतीत आहे तसेच बंगाली लोकांमध्येही असे भेद आहेत म्हणे.म्हणजे कुठेही जा माणुस इथुन तिथुन सारखाच.
एखाद्या पोटशाखेतील माणसाचा आलेला अनुभव आपण त्या पुर्ण जमातीला शाखेला लावतो अन त्यावरुन आपले मत  आपण बनवतो हे कितपत योग्य आहे.त्या समुहाची एक जगण्याची विशिष्ठ रित असेलही पण म्हणुन त्या व्यक्तीला नावे ठेवणे गरजेचे आहे काय?
dont hate in plurals. असे मला नेहमी म्हणावेसे वाटते.एखादा माणुस आत्ता असा वागला तरी दरवेळी तो तसाच वागेल ह्याचीही खात्री नाही देता येत तर...
तो तसा वागला ह्याला तात्कालिक परिस्थितीही कारणीभुत असतेच की!
कदाचित तो त्यावेळेला disturb असेल.थकलेला असेल किंवा अन्य काही कारणाने उदास असेल तर त्याच्या ह्या upset मुड मध्ये त्याला पहिल्यांदा बघणारा माणुस हा ना असाच upset minded आहे असे लेबल लाउन गेला तर. ह्यात दोघांचाही दोष नाही,नाण्याच्या दोन बाजु आहेत ह्या प्रत्येकाला आपली बाजु योग्य वाटते. कधितरी तटस्थ राहुन,सकृतदर्शनी निर्णय टाळायला हवा का? एखाद्या विषयी लगेच असा ग्रह करुन घेणे बरोबर नाही ना?

शुक्रवार, जून २५, २०१०

वटपोर्णिमा

काल वटपोर्णिमा झाली,त्या निमीत्ताने वेगवेगळ्या चर्चेला उत आला.ती करावी न करावी सारख्या अनेक विषयांवर सर्वत्र साधकबाधक चर्चा वाचायला मिळाली.
वडाची पुजा नवर्‍याच्या आयु:वृध्दीसाठी असेल असे नाही मला वाटत.सावित्रीचा नवरा त्या पुजेवेळी तिथे जवळच निपचित पडलेला होता.(आपले नवरे वडाला फेर्‍या मारताना असतात का बरोबर?) त्यावेळी वडाच्या डेरेदार सावलीच्या आडोशाने त्याला ताजेतवाने केले असल्याची शक्यता नाकारता येत नाही.(नाहीतरी वडाच्या झाडापासुन जास्त प्राणवायुचे उत्सर्जन होते असे म्हणतात.)
राहता राहिला प्रश्न की त्या यमाला तिने बरोबर शाब्दिक जंजाळात अडकवले अन मनासारखा वर मिळवला.याचा अर्थ तिचे मार्केटिंग स्किल जबरदस्त असावे.(नाहीतरी आजच्या काळात असे ग्राहकांना बरोबर गळी उतरवणारे लोकच जास्त नफा मिळवतात ना.)मग तुम्ही म्हणाल यात यमाचा फायदा काय,त्याचा काय फायदा नाय पण आपल्याला बी टोपी घालणारा कोणीतरी भेट्ला ह्यावरुन पुढच्या काळात त्याने विचार करुन बोलण्याची काळजी घेण्याचा धडा यातुन मिळवला असावा.
जोक्स अपार्ट पण मुद्दा हा की परंपरा आहे म्हणुन याचे पालन करायचे का नाही?
माझ्या मते त्या प्रथेच्या निमीत्ताने जर पर्यावरणाचा र्‍हास होणे थांबणार असेल तर अशा परंपरा चालु राहिल्या तरी चालेल.पुजेला भविष्यात वड रहावा म्हणुन आसपासची वडाची झाडे जर वाचत असतील तर...(हा घरी वडाची फांदी तोडुन आणुन पुजा करणार्‍यांनी ती न केलेलीच बरी)
पत्रीपुजेच्या निमीत्ताने झाडाची पाने ओरबाडण्यापेक्षा प्रथा बदलुन पत्री साठी लागणार्‍या झाडाचे उपयोग त्या पानाऐवजी देवासमोर उच्चारले तर (तेवढीच माहितीत भर) आजुबाजुला त्या झाडांची लागवड करता आली तर ती करावी म्हणजे येणार्‍या पिढीला त्या झाडांची त्यांच्या गुणवैशिट्यांची माहिती तर होईल.
निर्माल्याचा खतासाठी उपयोग केला तर चांगले खत बनेल.(पण जर हे करणे शक्य नसेल तर देवाला फुलांचे भारेच्या भारे वाहुन नद्या खराब करण्यापेक्षा नुसते हात जोडणे जास्त पुण्यदायक होईल.)