आपल्याकडे कसे देशस्थ कोकणस्थ वगेरे भेद आहेत तसेच भेद इकडे निमाडी अन मालवी संस्कृतीतही दिसुन येतात. मला वाटायचे की हे फक्त आपल्यातच आहे कि काय? हे जसे इथल्या संस्कृतीत आहे तसेच बंगाली लोकांमध्येही असे भेद आहेत म्हणे.म्हणजे कुठेही जा माणुस इथुन तिथुन सारखाच.
एखाद्या पोटशाखेतील माणसाचा आलेला अनुभव आपण त्या पुर्ण जमातीला शाखेला लावतो अन त्यावरुन आपले मत आपण बनवतो हे कितपत योग्य आहे.त्या समुहाची एक जगण्याची विशिष्ठ रित असेलही पण म्हणुन त्या व्यक्तीला नावे ठेवणे गरजेचे आहे काय?
dont hate in plurals. असे मला नेहमी म्हणावेसे वाटते.एखादा माणुस आत्ता असा वागला तरी दरवेळी तो तसाच वागेल ह्याचीही खात्री नाही देता येत तर...
तो तसा वागला ह्याला तात्कालिक परिस्थितीही कारणीभुत असतेच की!
कदाचित तो त्यावेळेला disturb असेल.थकलेला असेल किंवा अन्य काही कारणाने उदास असेल तर त्याच्या ह्या upset मुड मध्ये त्याला पहिल्यांदा बघणारा माणुस हा ना असाच upset minded आहे असे लेबल लाउन गेला तर. ह्यात दोघांचाही दोष नाही,नाण्याच्या दोन बाजु आहेत ह्या प्रत्येकाला आपली बाजु योग्य वाटते. कधितरी तटस्थ राहुन,सकृतदर्शनी निर्णय टाळायला हवा का? एखाद्या विषयी लगेच असा ग्रह करुन घेणे बरोबर नाही ना?
पुस्तकं 'खाण्याचं' खूळ !
१४ वर्षांपूर्वी
1 टिप्पणी:
असे भेद गैरभारतीयांसुद्धा आहेत.
टिप्पणी पोस्ट करा