माझी ब्लॉग सूची

शुक्रवार, जानेवारी १५, २०१०

प्रसंग एक:सकाळी समोर रहाणारी मुलगी आली होती.कालच हातावर मेंदी काढली होती मी तिच्या, त्या 7-8 वर्षाच्या मुलीला हाताच्या मागेही मेंदी काढुन हवी होती.ती सकाळी आली तेंव्हा मी पोळ्या करत होते. म्हणुन तीला दुपारी बोलावले.ती म्हणाली "दुपारी नाही येणार मी, ग्रहण आहे ना! 3.30 नंतर येइन.आई दुपारी बाहेर जाऊ नको म्हणाली".
प्रसंग दोन :मुलीच्या शाळेत आज परिक्षा होती,12.30 ची शाळा अन 12.20  झालेतरी व्हॅन आली नाही म्हणुन फोन लावला,"आज तो छुट्टी है, आज ग्रहन आ गया ना,आज की परिक्षा 25 को लेंगे."इति व्हॅनवाला.
प्रसंग तीन: मुलीची मैत्रीण  आली होती खेळायला, वय 3.5 .मला म्हणाली," काकु आज मी आंघोळ नाही केली".मी म्हणाले "चालते एखादेदिवस आज थंडी जास्त आहे ना म्हणुन आईने नसेल घातली आंघोळ". ती म्हणाली," नाई बाबा पण आज दुपारीच करणार आहेत आंघोळ आज ग्रहण आहे ना,दुपारी करतात का कधी अंघोळ?" आता काय उत्तर द्यावे या विचारातली मी.(तिची आई सकाळी आठाच्या आत अंघोळ करते त्याशिवाय ती काही काम करत नाही.) ती विचारत होती की,"तुम्ही पण परत आंघोळ करणार का?"
हे दोन तीन  प्रसंग घडतात तोवर टी.व्ही वरचे ग्रहणाचे क्लिपींग बघुन मी पण काळ्या फिल्म मधुन सुर्य बघु लागले.काय मस्त दिसला तो सुर्य. कधी अशी कोर पाहिलीच नव्हती ना सुर्याची. वा फार मस्त वाटले.हे ही छोटे मोठे आनंदाचे कवडसेच.ते पाहुन शेजारच्या घरातल्या मुलीने विचारले की "मी पण बघु का?"मी म्हणाले "बघ की",काळ्या सुर्यचष्म्यातुन माझ्या मुलीला पण दाखवला मी सुर्य ती पण म्हणाली," आज सुर्याबाप्पाचा चंदामामा झालाय" म्हणुन.पण ती बारावी सायंसची ताई आली नाही ती म्हणाली "आई नको म्हणाली". तीच्यामागेच तीची msc फिजिक्स झालेली मावसबहिण उभी होती.तीने तर यावर बघण्याची उत्सुकता सोडाच पण काहीही भाष्यही केले नाही.(फार प्रयत्नाने आत्ताच लग्न जमले आहे तीचे कदाचित त्याच विचारात असेल ती)
नंतर मी झोपले असताना माझ्या मुलीने परत तो चष्मा लावला अन आता सुर्यबाप्पा पुर्ण दिसतोय का ते मी पाहते असे म्हणाली.
इथे मला कोणाला कमी दाखवायचे नाही किंवा माझी मुलगी कशी हुशार हेही सांगायचे नाही पण चार वेगवेगळ्या वयोगटाच्या अन वेगवेगळ्या कुटुंबातील मुली माझ्या समोर आल्या त्यावरुन मनात तयार झालेल्या चित्राला मी शब्दबध्द केले इतकेच. ह्या सगळ्या आपल्यासारख्या सुशिक्षित घरातल्या मुली आहेत मला परंपरा पाळण्याविषयी वा स्वछतेविषय़ीही काही म्हणायचे नाही पण आज आपण एखाद्या गोष्टीचे अंधानुकरण करण्यापेक्षा त्या मुलींनी ह्या ग्रहण बघण्याचा आनंद घेतला असता तर..... 3043 ला परत असे दिसणार आहे म्हणे असे ग्रहण, परत बघण्यासाठी आपण असणे शक्यच नाही तर मग with proper precaution आत्ताचे  हे ग्रहण बघायला काय हरकत!.त्या 3.5 वर्षाच्या चिमुरडीला काय माहित की ग्रहण काय,अन त्या नंतर आंघोळ का करायची? ती हेच वातावरण बघत मोठी झाली तर.....बर त्यापेक्षा मोठ्या अन science backround च्या मुलींचीही ह्याविषय़ीची अनास्था मला जास्तच हलवुन गेली.हे एका मोठ्या इंदोर सारख्या शहरातील दृष्य तर इतर गावात तर.......

गुरुवार, जानेवारी ०७, २०१०

एखादी गोष्ट अकस्मात मिळाली तर किती आनंद होतो नाही!परवा असेच बाहेर गेलो जेवल्यावर फिरायला.नेहमीच्या बागेत जास्तच गार वाटत होतं म्हणुन रामाच्या मंदिराबाहेरच्या पारावर बसायचे ठरवले.तिथे गेल्यावर अभंग ऐकायला आला.थोडे पुढे गेलो तर अमोल बावडेकर गात होता.मी अगदी घरातल्या कपड्यात होते,आत जावे कि बाहेरुनच ऐकावे काही ठरत नव्हतं.तेवढ्यात मध्यंतर झाला अन माझी मैत्रिण आली आतुन बाहेर.म्हणाली चल आत.कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.मग आम्ही दोघी आमच्या मुलींसमवेत आत अगदी समोरच्या गादीवर बसुन अगदी घरगुती मैफिलीसारखा कार्यक्रम पाहिला.आज दवण्यांचा सावर रे आहे.