प्रसंग एक:सकाळी समोर रहाणारी मुलगी आली होती.कालच हातावर मेंदी काढली होती मी तिच्या, त्या 7-8 वर्षाच्या मुलीला हाताच्या मागेही मेंदी काढुन हवी होती.ती सकाळी आली तेंव्हा मी पोळ्या करत होते. म्हणुन तीला दुपारी बोलावले.ती म्हणाली "दुपारी नाही येणार मी, ग्रहण आहे ना! 3.30 नंतर येइन.आई दुपारी बाहेर जाऊ नको म्हणाली".
प्रसंग दोन :मुलीच्या शाळेत आज परिक्षा होती,12.30 ची शाळा अन 12.20 झालेतरी व्हॅन आली नाही म्हणुन फोन लावला,"आज तो छुट्टी है, आज ग्रहन आ गया ना,आज की परिक्षा 25 को लेंगे."इति व्हॅनवाला.
प्रसंग तीन: मुलीची मैत्रीण आली होती खेळायला, वय 3.5 .मला म्हणाली," काकु आज मी आंघोळ नाही केली".मी म्हणाले "चालते एखादेदिवस आज थंडी जास्त आहे ना म्हणुन आईने नसेल घातली आंघोळ". ती म्हणाली," नाई बाबा पण आज दुपारीच करणार आहेत आंघोळ आज ग्रहण आहे ना,दुपारी करतात का कधी अंघोळ?" आता काय उत्तर द्यावे या विचारातली मी.(तिची आई सकाळी आठाच्या आत अंघोळ करते त्याशिवाय ती काही काम करत नाही.) ती विचारत होती की,"तुम्ही पण परत आंघोळ करणार का?"
हे दोन तीन प्रसंग घडतात तोवर टी.व्ही वरचे ग्रहणाचे क्लिपींग बघुन मी पण काळ्या फिल्म मधुन सुर्य बघु लागले.काय मस्त दिसला तो सुर्य. कधी अशी कोर पाहिलीच नव्हती ना सुर्याची. वा फार मस्त वाटले.हे ही छोटे मोठे आनंदाचे कवडसेच.ते पाहुन शेजारच्या घरातल्या मुलीने विचारले की "मी पण बघु का?"मी म्हणाले "बघ की",काळ्या सुर्यचष्म्यातुन माझ्या मुलीला पण दाखवला मी सुर्य ती पण म्हणाली," आज सुर्याबाप्पाचा चंदामामा झालाय" म्हणुन.पण ती बारावी सायंसची ताई आली नाही ती म्हणाली "आई नको म्हणाली". तीच्यामागेच तीची msc फिजिक्स झालेली मावसबहिण उभी होती.तीने तर यावर बघण्याची उत्सुकता सोडाच पण काहीही भाष्यही केले नाही.(फार प्रयत्नाने आत्ताच लग्न जमले आहे तीचे कदाचित त्याच विचारात असेल ती)
नंतर मी झोपले असताना माझ्या मुलीने परत तो चष्मा लावला अन आता सुर्यबाप्पा पुर्ण दिसतोय का ते मी पाहते असे म्हणाली.
इथे मला कोणाला कमी दाखवायचे नाही किंवा माझी मुलगी कशी हुशार हेही सांगायचे नाही पण चार वेगवेगळ्या वयोगटाच्या अन वेगवेगळ्या कुटुंबातील मुली माझ्या समोर आल्या त्यावरुन मनात तयार झालेल्या चित्राला मी शब्दबध्द केले इतकेच. ह्या सगळ्या आपल्यासारख्या सुशिक्षित घरातल्या मुली आहेत मला परंपरा पाळण्याविषयी वा स्वछतेविषय़ीही काही म्हणायचे नाही पण आज आपण एखाद्या गोष्टीचे अंधानुकरण करण्यापेक्षा त्या मुलींनी ह्या ग्रहण बघण्याचा आनंद घेतला असता तर..... 3043 ला परत असे दिसणार आहे म्हणे असे ग्रहण, परत बघण्यासाठी आपण असणे शक्यच नाही तर मग with proper precaution आत्ताचे हे ग्रहण बघायला काय हरकत!.त्या 3.5 वर्षाच्या चिमुरडीला काय माहित की ग्रहण काय,अन त्या नंतर आंघोळ का करायची? ती हेच वातावरण बघत मोठी झाली तर.....बर त्यापेक्षा मोठ्या अन science backround च्या मुलींचीही ह्याविषय़ीची अनास्था मला जास्तच हलवुन गेली.हे एका मोठ्या इंदोर सारख्या शहरातील दृष्य तर इतर गावात तर.......
पुस्तकं 'खाण्याचं' खूळ !
१४ वर्षांपूर्वी
९ टिप्पण्या:
आपल्या बेड्या फारच पक्क्या आहेत त्या इतक्या सहजा सहजी तुटणार नाहीत.. :)
अगदी खरे आहे. विज्ञानाने अनेक गोष्टींची फोड केली तरी लोक 'बाबा वाक्यं प्रमाणम' मानणारे आहेत. 'का' हा प्रश्नच त्यांना पडत नाही. मुक्या मेंढरासारखे आपल्या पूर्वसुरींच्या वाटेवरच चालत रहातात. त्यातून हे असे होते.
अगदी बरोबर महेंद्रजी ... त्या बेड्या अजून तुटायला खूप वेळ लागेल !! पण मी अजून अशा सोडली नाही :) .
Great Blog Bhagyashree..
saglech lekh khup chaan aahet..!
aata nehmi vachen ha blog..!
धन्यवाद.प्रतिक्रिया देणार्या मेघना,महेन्द्र,अभिनय,unadkya.ह्या सर्वांचे आभार.
हा..हा.. हैदराबाद मध्ये सुद्धा काही वेगळे द्रुष्य नव्हते....
महेंद्र्जी म्हणल्याप्रमाणे मानसिक बेड्या खुप मजबूत आहेत, तोडने कठीण.
खरे आहे आनंदजी.
kharay agadi... kaltay tari valat nahi ashi paristhiti aahe public chi...
kashyala baghaycha? kashyala risk (risk chi vyakhya pratyekachi vegali asate) ghyayachi? ashya vicharane barach kahi life madhe miss karato aapan...
mast lihila aahes... ekdum smooth...
dhanyu re.
टिप्पणी पोस्ट करा