माझी ब्लॉग सूची

गुरुवार, सप्टेंबर ३०, २०१०

आज नेहमीप्रमाणे लॅबमध्ये पेशंट येत होते. एक लहानखुरी दिसणारी अतिशय

सुंदर युवती दवाखान्यात आली.नेहमीप्रमाणे आम्ही तिला रिपोर्ट घ्यायला

यायची वेळ सांगीतली.ती म्हणाली "कल आ सकुंगी कि नही पता नही" हा

आमच्यातला संवाद आहे कालचा.ती मुसलमान होती अन आम्ही हिंदु.तीच्या

ह्या वाक्यानंतर आम्ही दोघीही अर्थपुर्ण हसलो. किती छोटा अन साधारण प्रसंग

होता हा पण ह्यातुन सर्वसामान्यांना जाणवणारी दहशत मात्र तीच्या अन

आमच्या बाबतीत मात्र सारखीच होती.माणुस हिंदु असो वा मुसलमान पन तो

सामान्य आहे ना मग तो ह्यात भरडला जातोच.तीला कल क्या होगा पता नही

हे तेवढ्याच मोकळेपणाने आमच्यासमोर व्यक्त करावेसे वाटले ह्यावरुनच

जाणवते की सर्वसामान्य जनतेला हे सगळे नको आहे.तीला शांतता हवी आहे

हे जातीचे अन पक्षाचे राजकारण तीला नको आहे.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: