अभि जाउन आता जवळजवळ पाच महिने झाले. आता ह्यातुन बाहेर पडुन लिहायचे ठरवलेही होते. पण...(हा पण बरेचदा घात करतो नै) काल पहिल्यांदाच एका समारंभाला उपस्थित रहावे लागले. अगदी जवळचे असल्याने गेले. सोबत कन्यका होती. माझी सर्हुद माझ्या मनाची पुर्ण काळजी घेत होती. पण इतके गोंजारुन घ्यायची सवय़ नसणारी मी ह्या सगळ्या प्रसंगात जास्तच कानकोंडी झाले. अपंगांना सहानभुती का नको असते याची थोडीफार जाणिवही ह्यातुन झाली.
निमीत्त होते बारशाचे.त्यामुळे "सवाष्णींची" असणारी लगबगही तिथे अपेक्षीत होती. माझ्या जावेने मला औक्षणासाठी मला बोलावले.दिवे लावतानाही सहभागी करुन घेतले. मात्र घुगर्या वाटताना तिच्या बरोबर सर्वांना हळदी कुंकु लावणारी माझ्या शेजारच्या मामीपर्यंत येउन परत गेली. त्यावेळी मी मुलीशी बोलत असल्यासारख्र करुन तीला मी पाहिले नसल्याचे दर्शवले. मात्र आमच्या **** ने तिला परत बोलावताना खुणवताना मी पाहिले.अन ते त्या कुंकु लावणारीनेही पाहिले. आता आली का पंचाईत.
मला त्यांच्यातले संभाषण कळले म्हणुन ती अस्वस्थ.अन तीला काय वाटेल मला कळलेलं बघुन,म्हणुन मी अस्वस्थ. परत माझासमोर येउन मला कुंकु लावण्याचा तो कार्यक्रम पार पडला . आता आले ना लक्षात मी वर अपंगांचे उदाहरण का दिले ते.आता नुसत्या घुगर्या दिल्या असत्या तर काही बिघडले असते का.पण आम्ही कसे तुला " आमच्यातलेच" समजतो हे दाखवण्याच्या प्रयत्नात उरलेल्यांनाही माझ्याविषयी कळले.नाही बाकिच्यांना कळले याबद्द्ल मला आक्षेप नाही पण त्यांचा problem होतो ना एकतर मला सरळ विचारता येत नाही अन त्या हळु म्हणुन जी कुजबुज करतात ती मात्र मला स्पष्ट ऐकायला येत असते हा आत्तापर्यंतचा माझा अनुभव आहे गेल्या पाच महिन्यातला.
मी तशी पहिल्यापासुनच हे सगळॆ मानणारी नाही even अभि असतानाही मंगळसुत्राविषयी आम्ही दोघेही उदासिनच होतो. कारण आमच्या प्रितीविवाहाच्या सुरवातीच्या काळात मला मंगळसुत्र घालण्याइतके पैसेही त्याच्याकडे नव्हते.(आता मात्र तो नसताना हे मंगळसुत्र माझ्या जवळच्या व्यक्तींना मी "तशी" बघायला कशीतरी वाटते म्हणुन घालते. बघताय ना आपण स्वत:साठी कमी अन दुसर्यांसाठीच सगळं करतो.)
तर सांगायचा मुद्दा हा की त्यांनी मला अशा पारंपारीक कामात सहभागी करुन घ्यावे अशी माझी अजिबात इच्छा नाही.(ओ कामकंटाळी नाही मी. पण अशा वेळी नक्की काय करायचे तेच मला उमजत नाही.)
वर आमची कन्यका मला म्हणते की त्या तुला बोलावतील का?
मी म्हटले may be बोलावलं, तर जास्त भाव न खाता जायचं. अन नाही बोलावले तर तुमच्या बच्चेकंपनीत हुंदडायला मी. मोकळी.असे माझे साधे गणीत.
माझ्यामुळे शक्यतो कोणाला त्रास होऊ नये ह्या प्रयत्नात असते मी नेहमी. मात्र समोरचा माझ्यामुळॆ अवघडलेला बघुन मला नक्की काय करायचं हेच कळत नाही.त्यामुळे मला com.plex येतो, बाकी काही नाही.
पुस्तकं 'खाण्याचं' खूळ !
१४ वर्षांपूर्वी
1 टिप्पणी:
असे प्रसंग खरतर दोन्ही बाजुवाल्यांसाठी थोडे कठिणच असतात...बाकी दयेचा भाव आणि अवांतर काळजी ह्यामुळे समोरच्या माणसाला आपण नकळत जास्तच दुखावत असतो ...
टिप्पणी पोस्ट करा