माझं असं का होतं तेच कळत नाही.कधितरी आपण हे काय करतोय असं वाटायला लागतं.समोरचा आपल्याला गृहित धरतोय हे पाहिल्यावर आधी किती त्रास व्हायचा पण आजकाल आपल्याला कशाचच काही वाटत नाही याबद्दलही आज मला आश्चर्य वाटतयं.आपला अहम आता जागाही नाही.कुणीही यावं अन टपली मारुन जावं हे काय आहे? इतकी कशी बदलले मी?
स्वत्वच राहिलं नाही का माझ्यात? कुठल्याही सामाजिक प्रश्नांनीही पेटणारी मी आजकाल मात्र शांतच असते. आपल्याला त्रास नाही ना मग कशाला त्रास करुन घ्या. इतकेच काय त्रास झाला तरी आपण मोठेपणाने त्यांना माफ करावयाला हवे हे लगेच वाटायला लागते.
एवढा समजुतदार पणा खरच आहे अंगात का हा पळ आहे परिस्थिती पासुन.समोरच्याच्या सगळ्या गोष्टी खरच मी माफ करू शकते का?
आजकाल घरात वाचायला भरपुर आहे,नेट आहे टि.व्ही आहे तरीही मनात काहितरी हुरहुर आहेच.ह्या सग़ळ्यात माझे लिख़ाण मात्र मागे पडत चाललयं हे मात्र नक्की! पुर्वी कुठलिही वही हाताशी आल्यावर त्यातच त्यावेळी मनात आलेले विचार लिहीत असे.हा म्हणायचाही की अशी कुठेहि कशी लिहतेस कुणी वाचलं तर त्यावेळी मी म्हणायची की अरे माझे जगणे खुल्या पुस्तकासारखे आहे कुणीही यावे वाचावे.पण आता मात्र पि.सी वर बसल्यावर लिहायलाच येत नाही.पुर्वी काम करता करता विचार सुचत जायचे कितीतरी पुर्वीचे लेख वाचताना हे आपणच लिहले आहे का? असा प्रश्न पडतो.हे असं का होतं हेच कळत नाहीये. कोणाच्या लेखालाही प्रतिक्रिया देतानाही लिहलेल्या प्रतिक्रिया मी कितीतरी वेळा पुसल्या आहेत. काही लेखन प्रकाशित करतानाही स्वांतसुखापेक्षाही आपला आडाणीपणा तर दिसणार नाही ना अशी भितीच प्रथम वाटते.
आपल्याभोवती कोश उभा करुन त्यातच रहायची सवय तशी जुनीच आहे माझी.मी स्वत: खुश राहण्यापेक्षा दुसर्यांच्याच मनाचा विचार नेहमी करते.माझ्या कोणत्याही वागण्याबोलण्याने माझा प्रस्थापिताचा बुरखा फ़ाटणार तर नाही ना ह्याची सतत काळजी घेतच कोणतिही गोष्ट करते.
मला कधितरी( ( म्हणजे बर्याचदा) बघा परत बुरखा आलाच) माझ्या कर्तव्याचाही कंटाळा येतो खरच अन असा विचार येतो म्हणुन त्रासही होतो. घरात माझेच म्हणणे चालावे हा अहम हि नेहमी मनात असतोच पण बघा तुमच्यासाठी मी किती करतेय हे दाखवायची पण फार हौस असतेच मनात.अन मी एवढे ह्या सगळ्यांसाठी करतेय तरी कोणाला त्याच काही आहे का? हे पण वर असतंच मनात!
स्वत: काही करत नाही अर्थाजन करत नाही हि बोच असुनही अरेरावीही आहेच मग घरची जबाबदारी तरी व्यवस्थित पार पाडावी तर ते ही फारसे मनापासुन होत नाही.अशी हि चिंतातुर जंतु मी!
जन्माला आला अन वाहता वाहता गेला असे सामान्य आयुष्य आहे खरे तर पण ते मानायलाही मन तयार आहे का बघा, समोरच्याने कायम आपल्याला डोक्यावरच घेतले पाहिजे हा हटट. समोरचा बोलायला आला नाही तर तो शिष्ठ.अन आला तर त्याच्या हेतुविषयीच शंका.रोज आला बोलला तर लोचट वगैरे!
समोरच्याला बघितल्यावरच त्याच्याविषयी एक पक्का ग्रह करुन घ्यायचा अन त्याच भावनेने त्याला जोखायच.हा नेहमी म्हणतो बदल हे. पण कळतय पण वळत नाही(का वलवुनच घ्यायच नाही?) अशी माझी अवस्था.आता परत हे मनात साठलेले त्याला बोलले असते नेहमीसारखेच तर तो हेच म्हणेल की रिकामी आहेस म्हणुन हे सगळं सुचतयं.त्याच्या पैशावर बसुन खातो हि बोच आहेच पण म्हणुन बाहेर जाउन काही करुन दाखवते का?तर तेही नाही माणसं आपणहोउन बोलतात तरी मला बोर होतं.बाहेरही पडायचा कंटाळा येतो. मी अशी कशी काय?मलाच काही कळेनासे झालेय.माझी सवय मुलीला लागतेय म्हणुन तो अस्वस्थ.
चला आज खरडल्या चार ओळी.
पुस्तकं 'खाण्याचं' खूळ !
१४ वर्षांपूर्वी
६ टिप्पण्या:
vichar spastha maandalet... baher ya hyatun pan... :)
Tumhi ekhadya chandat man ramavale tar ya vicharamadhun tumachi sutaka hoil.Tumacha lekh vachun mala ase vatale ki he sukh dukhate ahe. Yatun (self-pity) baher yenyasathi kahi tari naveen- je tumahla avdel, te shika. Ekhahdya samajsevi sansthet purna vel- ardh vel kaam kara.. Itarnsathi jagun bagha. Jamalyas thode arthrjan karata yeil asa vyavasay kara.tymule tumacha atmasanmaan vrudhingat hoil.purvagrah na thevata mitra- maitrini joda. tumhi jagakade adhik khulepanane pahayala shikal ani traasdayak vicharana tumachyakade firkayala fursatach honar nahi. tumhala shubheccha
आयुष्यात अशी फेझ येते. ती तात्पुरती असते. त्यावर फार विचार करून चालत नाही. त्या फेजमधून बाहेर पडायला हवे. सकारात्मक वाचायला हवे. पहायला हवे. नवे मैत्र जोडून सकारात्मकता अंगी बाणवायला हवी. म्हणजे नैराश्याचे हे धुके फिटेल.
भाग्यश्री आता तुला रोज पिडतेच बघ मी...:D
तुझ्याकडे एक नितांत सुंदर लेक आहे. काही वर्षांनी ती भुर्रर्रकन....उडून जाईल.तोवर भरभरून आनंद गोळा करून घे. पुढे अनेक वर्षे त्याला उजळवावे लागेल.( स्वानुभव )बाकीचे खाजगीत लिहीते....:)
लिहीती राहा गं.
खर आहे तुझं म्हणणं.तुझ्या फोटोत सुध्दा तु किती energitic दिसतेस.तुझ्या contact मध्ये राहुन मी पण तशीच व्हाय़चा प्रयत्न करेन.नक्की.
भाग्यश्री तुला टॆगलयं गं...:)
टिप्पणी पोस्ट करा