काल वटपोर्णिमा झाली,त्या निमीत्ताने वेगवेगळ्या चर्चेला उत आला.ती करावी न करावी सारख्या अनेक विषयांवर सर्वत्र साधकबाधक चर्चा वाचायला मिळाली.
वडाची पुजा नवर्याच्या आयु:वृध्दीसाठी असेल असे नाही मला वाटत.सावित्रीचा नवरा त्या पुजेवेळी तिथे जवळच निपचित पडलेला होता.(आपले नवरे वडाला फेर्या मारताना असतात का बरोबर?) त्यावेळी वडाच्या डेरेदार सावलीच्या आडोशाने त्याला ताजेतवाने केले असल्याची शक्यता नाकारता येत नाही.(नाहीतरी वडाच्या झाडापासुन जास्त प्राणवायुचे उत्सर्जन होते असे म्हणतात.)
राहता राहिला प्रश्न की त्या यमाला तिने बरोबर शाब्दिक जंजाळात अडकवले अन मनासारखा वर मिळवला.याचा अर्थ तिचे मार्केटिंग स्किल जबरदस्त असावे.(नाहीतरी आजच्या काळात असे ग्राहकांना बरोबर गळी उतरवणारे लोकच जास्त नफा मिळवतात ना.)मग तुम्ही म्हणाल यात यमाचा फायदा काय,त्याचा काय फायदा नाय पण आपल्याला बी टोपी घालणारा कोणीतरी भेट्ला ह्यावरुन पुढच्या काळात त्याने विचार करुन बोलण्याची काळजी घेण्याचा धडा यातुन मिळवला असावा.
जोक्स अपार्ट पण मुद्दा हा की परंपरा आहे म्हणुन याचे पालन करायचे का नाही?
माझ्या मते त्या प्रथेच्या निमीत्ताने जर पर्यावरणाचा र्हास होणे थांबणार असेल तर अशा परंपरा चालु राहिल्या तरी चालेल.पुजेला भविष्यात वड रहावा म्हणुन आसपासची वडाची झाडे जर वाचत असतील तर...(हा घरी वडाची फांदी तोडुन आणुन पुजा करणार्यांनी ती न केलेलीच बरी)
पत्रीपुजेच्या निमीत्ताने झाडाची पाने ओरबाडण्यापेक्षा प्रथा बदलुन पत्री साठी लागणार्या झाडाचे उपयोग त्या पानाऐवजी देवासमोर उच्चारले तर (तेवढीच माहितीत भर) आजुबाजुला त्या झाडांची लागवड करता आली तर ती करावी म्हणजे येणार्या पिढीला त्या झाडांची त्यांच्या गुणवैशिट्यांची माहिती तर होईल.
निर्माल्याचा खतासाठी उपयोग केला तर चांगले खत बनेल.(पण जर हे करणे शक्य नसेल तर देवाला फुलांचे भारेच्या भारे वाहुन नद्या खराब करण्यापेक्षा नुसते हात जोडणे जास्त पुण्यदायक होईल.)
पुस्तकं 'खाण्याचं' खूळ !
१४ वर्षांपूर्वी
२ टिप्पण्या:
केवळ परंपरा म्हणुन एखादी गोष्ट करणे हे मला पटत नाही. तुमच्या बुध्दीला जे पटत ते स्विकारा हे तत्व मी वापरतो. लेख छान लिहीलात.
keep it up. best of luck for future blogging.
सावित्री मंत्र हा अनुष्टुभ छंदात गायिला जाणारा गायत्री मंत्र असून गयांचे- प्राणांचे रक्षण हे त्याचे उद्दिष्ट आहे. कोणत्याही मंत्राला तो साध्य करण्याची मानसिकता विकसित व्हावी यासाठी व्रते सांगितलेली आहेत. उदा. गायत्री मंत्राचे व्रत कोणाचाही कोणत्याही परिस्थितीत तिरस्कार करू नये हे आहे. वटपूजा हे सावित्री मंत्राचे व्रत आहे. पुराणकाळी प्रत्यक्ष मंत्र साध्य करण्यापेक्षा मंत्र साध्य करणारी मानसिकता जोपासण्यास महत्त्व आले. त्यामुळे व्रताना धर्मात प्रमुख स्थान मिळाले. नंतरच्या काळात व्रतपालनामागील ही भूमिका विसरली गेली. व्रताना नवीन स्वरूप देताना याचा विचार होत नसल्याने व्रते जुन्या स्वरूपातच चालू राहिली आहेत.
टिप्पणी पोस्ट करा