माझी ब्लॉग सूची

गुरुवार, एप्रिल ०५, २०१२

मानसिकतेशी संबंधीत..

सेंटर फॉर ऍडिक्टशन ऍण्ड मेंट्ल हेल्थ(सी ए एम एच) ने कॅनडा येथील अल्बर्टा येथे मोठ्या समुहाच्या दिर्घकाळ नोकरी केलेल्या अन आता नुकतेच नोकरीस लागलेल्या अशा दोन गटाच्या अभ्यासातुन हाती आलेल्या नव्या निष्कर्षानुसार,नैराश्येसाठी उपचार घेत असणार्‍या रुग्णांपैकी जे रुग्ण उपचार सुरु असताना कार्यमग्न असतात त्यांच्यात जास्त चांगले परिणाम दिसुन आले आहेत. 
ज्या कर्मचार्‍यांना नैराश्येने ग्रासले आहे असे लोक जास्त उत्पादकता दाखवु शकत नाहीत. 
  पुर्वी केलेल्या अभ्यासानुसार नैराश्याचा परिणाम रुग्णाच्या बोलण्यावर, सामाजिक वावरावर,दैनंदिन कामकाजावर होताना दिसतो.असे मत सी ए एम एच चे मुख्य डॉ. कार्लिन देवा यांनी व्यक्त केले. देवा ह्या कार्यालयिन आरोग्य संशोधनाच्या प्रमुख आहेत.  
यात समाधानाची बाब अशी आहे की नैराश्यावरील उपचाराने लोकांच्या कार्यक्षमतेत कमालीचा फरक पडलेला दिसुन आला. उपचार न घेतलेल्यांच्या तुलनेत मध्यम उपचारक रुग्णांमध्ये अडिचपट कार्यक्षमता वाढल्याचे या प्रयोगाच्या निष्कर्षात दिसुन आले आहे.  
याच प्रमाणॆ योग्य उपचार घेतलेल्यांची कार्यक्षमता सातपट वाढल्याचे मतही त्या नोंदवतात. 
प्रयोगासाठी घेतलेल्या 3 हजार कामगारांपैकी साडेआठ ट्क्के लोक नैराश्येचा अनुभव घेत होते. यांची संख्या 255 होती. 
ह्या उपचारांनी रुग्णाची कार्यालयीन कार्यगती सुधारत असली तरी नैराशेमुळे आलेल्या आजारात ही तितकीशी उपयोगी नाही 
"आम्हाला असे आढळुन आले आहे की तीव्र नैराश्येने ग्रासलेल्यांपैकी 57 टक़्क़े लोकांना उपचार मिळत नाहीत.आणी मध्यम नैराश्य असलेल्या 40 टक्के रुग्णानां अजुनही उपचाराविना रहावे लागते." असे मत देवा यांनी नोंदवले. 
 या आजाराविषयी आपल्याला आपल्या कामाच्या ठिकाणी मदत मिळु शकते याची माहितीच बर्‍याच जणांना नसल्याने लोकांच्या म आनसिकतेवरही याचा परिणाम होतो असे मत देवी यांनी व्यक्त केले. 
2. 

सर्वाधिक खोटे बोलण्याचा महिना जानेवारी. - एक निष्कर्ष. 
 
 
नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार,वर्षातील इतर कुठल्याही महिन्यापेक्षा लोक जानेवारीत जास्त खोटे बोलतात असे समोर आले आहे.  
यातील बहुतेकजण आपल्या नवीनवर्षाच्या समारंभाची अतिरंजीत वर्णने करतील तर काही आपल्याला किती गिफ्ट मिळाले याची फुशारकी मिरवतील. तर काही आपल्या डायेट प्लान च्या कटॆकोर नियोजनाच्या बढाया मारतील तर काही 217 पोर्कीज रिचवल्याच्याही बाता करतील(आपल्याकडील सर्वे असता तर किती वडापाव खाल्ले याची माहिती असली असती.) 
डेली ऎक्सप्रेस च्या रिपोर्टनुसार वर्षाअखेरच्या पार्टीत किती प्याले रिचवले हे सांगण्याचीही अहमहमिका लोकांमध्ये या महिन्यात लागत असेल हे नक्की!
"लाय टु मी" या टि.व्ही शो ने घेतलेल्या सर्वेनुसार ह्या महिन्यात,अर्ध्याहुन अधिक लोक थंडीचे खोटे कारण सांगुन फिरण्यापासुन तर आजाराचे कारण सांगुन दिवसाच्या कामापासुन सुटका करुन घेताना अढळले आहेत.  
 आपण जानेवारीत दिवसाला 7 वेळा,तर उर्वरीत वर्षभर दिवसातुन 4 वेळा खोटे बोलतो.असे पाहणीच्या निष्कर्षात आढळले आहे.  
पण दोन हजार व्यक्तींपैंकी अर्ध्याधिक लोकांनी आपले खोटे जानेवारीत वरचेवर पकडले गेल्याचे नमुद केले आहे.
लोकांच्या खोटेपणात पैसा हा वरच्या क्रमांकावर आहे.कारण नववर्षासाठी खर्च केलेल्यापैकी किती खर्च हा क्रेडिट कार्डावर तर किती रोखीने केला हे खोटेच सांगणे(म्हणजेच उधार अन उसनवार किती अन ऋण काढुन सण किती हे गुलदस्त्यात ठेवणॆ.) 
पावटक्के लोक आपण सेलवर घालवलेल्या पैशाबद्द्ल,पाचजण नवीन वर्षस्वागताबद्दल खोटे बोलतात. आपण लै भारी हॉटॆलात पार्टी केली म्हणणारे लोक मात्र घरात बसुन टि.व्ही बघत असतात. 
काहीजण समोरच्याला बरे वाटावे म्हणुन खोटे बोलतात.
देहबोलीतील मास्टर, जेम्स बोर्ग यांच्या म्हणण्यानुसार बहुतेक जणांना आपण सपशेल खोटे ओळखु शकतो असा गाढ विश्वास  असला तरी हे खरे नाही. बालपणीचा काळ सुखाचा... लहानपण हा पोरखेळ नव्हे.... 
 
 
तुमचे लहानपण किती आनंदात गेले. हा प्रश्न साधा वाटत असला तरी ह्याचे उत्तर वाटते तितके सोपे नाही.  बहुतेक लोक ह्या विषयी उत्तरताना आपल्या आठवणींचा,आयुष्यात घडलेल्या गोष्टींचा धांडोळा घेतात. त्यांच्या लहानपणी संपर्कात आलेली माणसे,घडलेल्या गोष्टी याचा संदर्भ ह्या बालपणींच्या आठवणीत येतो.  काही आठवणी सुखकर, काही उदासवाण्या काही भितीदायक असतात. 
आपल्या बालपणीचे चित्र आपण अनुभवलेल्या सगळ्या बर्‍या वाईट घटनांचे सारच असते.मग त्या घटना 
बर्‍या वाईट दोन्ही पद्धतीच्या असतील.हे नक्की सांगता येत नाही की त्या लहाणपणीच्या आठवणी कितपत वास्तववादी याबाबत नक्की काही ठोस विधान करणे कठिण आहे.म्हणजे लहानपणी भितीदायक वातलेली बागुलबुवा प्रत्यक्षात ताई वा दादाच्या घाबरवण्यामुळे जास्त भितीदयक वाटलेला असतो. कारण त्या घटनांचा अर्थ आपण आपल्या त्यावेळच्या बुद्धीच्या कुवतीनुसार लावलेला असतो.अन तोच आपल्या मनावर कोरला गेलेला असतो. बरेचदा आपल्या आजुबाजुच्या व्यक्तींनी सांगितल्या घटना,तेंव्हाचे तात्कालिन फोटो, वा सांगोपांगीचा प्रभावही आपल्या लहानपणींच्या आठवणींवर झालेला आढळतो. मोठ्यांच्या दृष्टीकोनातुन पाहिल्यास आपल्या लहानपणाचे वेगळेच पैलु समोर येतात. उदाहरणार्थ लहान पणीच्या घटना,कोणाचे चिडवणे, मित्राने लावलेल्या शेंड्या , एखाद्याचे प्रेम राग ह्या लहानपणीच्या अनुभवाचा परिणाम सध्याच्या नात्यावर होतो.
 नुकत्याच केलेल्या निरिक्षणातुन असे समोर आले आहे की, बालपण आनंदात घालवलेल्या मुलांचे सामाजिक भान,स्व-विकास, व आत्ताची वागणुक ही जास्त योग्य असते,चांगली असते.बालपणीच्या विचित्र घटनांचा पगडा असणार्‍या मुलांना त्यांच्या प्रत्येक नाते संबंधात अडचणी येतात.स्वमग्नता व ताण अशा लोकांमध्ये जास्त बघायला मिळतो. 
 मुलांची अती काळजीही त्यांच्या सशक्त मानसिक वाढीसाठी नुकसानकारकच आहे.याबाबत पालकांना पुस्तके,मासिकातील लेख, टि.व्ही. संकेतस्थळ आदी ठिकाणाहुन विपुल माहिती मिळु शकते. आपल्या पाल्याने अभ्यास वाचन क्राफ्ट यासारख्या गोष्टींवर किती वेळ घालवावा यावर पालकांची नेहमी द्विधा मनस्थिती असते. कोणती खेळणी, खेळ टि.व्ही वरील कार्यक्रम, व्यायाम, संगीत,किंवा रोल् मॉडेल मुलांसाठी योग्य आहे, त्यांना फायदेशीर काय आहे? कोणते बघण्यालायक आहेत? व कोणते धोकादायक आहेत?याबाबत लोक कायम गोंधळलेले असतात. 
  मुलाच्या लक्षात राहावा असा अविस्मरणीय वाढदिवस साजरा करणे ही आपली जबाबदारी आहे.नव्हे तर त्याच्या बालपणीच्या सुखद आठवणीसाठी ते गरजेचेही आहे.पण त्यावेळी महागडे गिफ्ट दिले पाहिजे हे गरजेचे नाही. बाबानी लहानपणी दाखवलेली जुगनुंची(काजव्यांची) माळ मुलाला समृद्ध् करुन जाते. 
 नुकत्याच केलेल्या पाहणीत हाती आलेल्या निष्कर्षानुसार, आपल्या लहानपणीच्या मनावर कोरलेल्या घटना आपल्या आत्ताच्या वागणुकीचा आरसाच असतात.आपल्या घरातील लोकांचे एकमेकांशी असलेले संबंध, भावभावनांची देवाणघेवाण, आपल्या पद्धती,रीवाज, परंपरा, एकमेकांची गुपिते,घरच्या मंडळींचे एकमेकांशी असलेले सशक्त नातेच मुलाचे बालपण समृद्ध करत असते.  मुल व्हिडिओ गेम खेळण्यात,टि.व्ही बघण्यात किती वेळ घालवते,ते किती चांगले संगीत ऐकते , कोणती चित्रे काढते यापेक्षाही ते कशा वातावरणात वाढते यावरच बालपणीच्या सुखद आठवणी अवलंबुन असतात.   
 पालक मात्र मुलांना लहानपणी आलेल्या विचित्र अनुभवावर चर्चा करताना दिसतात त्यापेक्षा सध्या त्यांना (मुलांना) भेडसावणार्‍या समस्येचा विचार पहिल्यांदा अन प्राधान्याने व्हायला हवा.  तीव्र शारिरीक आजार,शालेय प्रगतीत येणारे अडथळे यांच्यावर उपचारासाठी लहानपणीच्या चांगल्या आठवणींची मदत नाही घेता येत. मात्र मुलांमधील धसमुसळेपणा,लोकांकडुन नाकारले गेल्याची जाणीव यासारख्या समस्या सोडवताना बालपणाची नक्कीच मदत होते. मुलांना प्रत्येक धोक्यापासुन वाचवणे शक्य नसले तरी त्यांची दखल घेतल्याने स्वभावातील आश्वसक बदल नाक्कीच घडवता येतो. प्रीय व्यक्तींचा विरह, एकटेपणा यात कोसळणारा तरुण हा त्याच्या लहानपणीच्या दु:खी मानसिकतेचे प्रतिक आहे. आपल्या बाह्यरुपाविषयी नाखुश, वजन कमी करण्याचा प्रयत्न,वारंवार केशरचनेतील बदल हे अस्थिर मानसिकतेतुन येते.
  पालकांनी मुलाच्या शैक्षणीक, क्रिडा तसेच सांगीतीक व कलेच्या प्रगतीत नक्कीच लक्ष घालायला हवे. एखाद्या घटनेबद्दल पाल्य कसा विचार करतो यावरच त्या मुलांच्या बालपणीच्या सुखद आठवणी अवलंबुन असतात. मुलाला आपल्या विजयाचा अनुभव नक्की मिळाला पाहिजे. त्याला एखाद्या घटनेत आनंद घेता यायला हवा.यशही सहज स्विकारता यायला हवे.
 त्याच्या बालपणीच्या सगळ्याच स्मृती आनंददायी असतील असे नाही पण तात्कालिन लोकांचे वागणे हे त्या घटनांपेक्षा जास्त परिणामकारक ठरते. आपल्याला बक्षीस नाही मिळाले तरी आई बाबा त्यावेळी कसे वागले हे त्याच्या अंतरमनावर कोरले जाते. मुलांची त्यावेळची कमतरता काही न मिळाल्याची जाणीव पालकांएव्हढी जाणवत नाही.म्हणजेच आपण बंड्याला तो महागडा गेम घेउन दिला नाही याचे शल्य मुलापेक्षा बंड्याच्या आई बाबांनाच जास्त असते. पालकांचा मुलाप्रती असलेला प्रेमळ व्यवहार बालपण रम्य करण्यास मदत करतो. आपण मुलांना किती वस्तु घेउन दिल्या यावर त्यांचा आनंद अवलंबुन नसुन आपण त्याबरोबर कसा अन किती वेळ घालवला हे जास्त महत्वाचे असते.

1 टिप्पणी:

College Katta म्हणाले...

kharach sarvadhik ghot bolnycha divas mhanje janevari karan janevari mahinyt mhanje navin varshi kahitari sankalp karyche khotach bolat asto grat.............AMRUTA GHOLAP