मिपावर भाषेसंद्र्भात दिलेल्या एका प्रतिसादात मी गोळे काकुंनी शिकवलेली भाषा वापरली होती। तेंव्हाच नवरा म्हणाला की त्यांच्याविषयी लिही. आमच्या मिरजेच्या घरात त्या व काका भाड्याने रहात होते.त्यांचे घर बांधायला काढले होते.त्या पाळणाघर चालवायच्या. परिस्थीती यतातथाच होती. पण त्यांच्या तेवढ्या परिस्थितीतही त्यांच्या घासातला घास त्या आम्हाला द्यायच्या.त्यांचे पाळणाघर एक आदर्श पाळणाघर होते.त्यांच्याकडे येणार्या मुलांना त्या रोज घरचा गरमागरम वरण भात खावु घालायच्या. मुलांना श्लोक, पाढे, शिकवायच्या. आमच्या घरात आजी,आजोबा आणी मी व माझा मावसभाउ रहायचो.तो आणी मी प्रचंड भांडायचो. तो तर माझ्यावरनं आजीशी पण वाद घालायचा. आमच्यातनं तर विस्तव पण जात नसे. आजीच्या डोळ्याच्या ओपरेशनच्या वेळी आठ दिवस त्या क़ाकुंनीच आम्हा दोघांना संभाळलं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा