नर्मदा परिक्रमा एक अंतरयात्रा हे भारती ठाकूर यांचे नर्मदा परिक्रमेवरचे पुस्तक म्हणजे आपल्या सारख्या शहरी मानसिकतेच्या लोकांसाठी हे एक जळजळीत अंजनच म्हणावे लागेल कारण आपल्या शेजार्याशी देखील आपण मदत करताना कचरतो,तिथे भारतीताईंना भेटलेली ही साधी अत्यंत गरीब पण मनाने फार श्रीमंत असणारी माणसे आपल्याला आपली जागा दाखवुन देतात. आपल्या दाराशी आलेला याचक बघताच त्याच्या हेतुविषयीच पहिल्यांदा आपण शंकीत होतो,पण खेडेगावात मात्र नर्मदा परिक्रमावासी लोकांना देण्यात येण्यार्या सदावर्तात ती लोक आपल्या जवळ अन्नाची कमतरता असताना स्वत: उपाशी राहुन त्यांना(परिक्रमावासींना)जी मदत करतात ते वाचुन आपल्या खुजेपणाची वारंवारं जाणीव होते.ज्या गावातुन त्या आणी त्यांच्या मैत्रीणी जात होत्या.ती गावं अतिशय साधी, तिथल्या घराघरांतुन त्यांचे पुर्वापार चालत आलेल्रे कष्ट तर दिसत होतेच पण वर्षानुवर्षे त्या मार्गावरुन जाण्यार्या परीक्रमावासीयांची काळजी घेण्याची व्रुत्तीही भरभरुन वाहत होती. भारतीताईंनी त्या त्या वेळी त्यांच्या मनात येणारे विचार त्यांच्या सखीशी गुजगोष्टींच्या स्वरुपात फार छान मांडले आहेत.प्रत्येक ठेकाणी आपल्या शहरी लोक़ांचा खुजेपणा तर वाचताना सारखा जाणवतो.आपण त्या गावकर्यांच्या जागी असतो तर खरच असे वागु शकलो असतो का?असा विचार सारखा मनात डोकावतो. . भारतीताईंची भाषाही फार सोपी आणी प्रवाही आहे.वाचताना तर त्या स्थानाची चित्रफीतच डोळ्यांसमोर असल्याचा भास होतो.वाटेत दिसणारे वेग़वेगळे पक्षी त्यांचे वर्णनही वाचनीय झाले आहे.जागोजागी आपल्यातला मी कसा जाणवतो,त्याचा भाव कसा बदलत जातो हे त्यांनी फार चांगल्या पध्दतीने मांडले आहे.एरव्ही आपल्या सुरक्षीत जगात वावरताना किती अकारण आणी अवाजवी गोष्टींचा संग्रह करत असतो हे ते वाचताना वारंवार जाणवते.स्वत:च्या सुरक्षीत जगात वावरतानाही आपण जेवढे निवांत नसतो त्याहुनही अधीक निवांत आपण त्या परिक्रमेत असताना होतो. वास्तवीक स्वत:कडे कोणताही संग्रह नाही.उद्या काय घडणार आहे त्याची शाश्वती नाही.एवढेच काय पण जेवणासाठीचीही तरतुद नसताना आपण कोणत्यातरी अद्न्यात शक्तीच्या भरवशावर आपण पुढे जात असतो.वाटेतल्या सगळ्या संकटाची काळजी घेणारा तो कोणत्या ना कोणत्यातरी रुपात आपली काळजी घेतो,मनातल्या बाळबोध इछाही तो पुर्ण करतो याचा प्रत्यय पदोपदी वाचताना येतो. वाटेत भेटणारे वेगवेगळे लोक,साधु,अध्यात्मातल्या अधिकारी व्यक्ती,आपल्या मनातल्या विवीध शंकांचे निराकरण अगदी सोप्या भाषेत आपल्यापर्यंत पोहोचते.नर्मदेवर बांधण्यात येणार्या धरणामुळे विस्थापित होणार्यांचे वास्तव,त्याचे त्यांच्या जीवनावर होणारे परिणाम लेखिका अगदी परीणामकारक रित्या आपल्यापर्यंत पोहोचवते.त्यातला ज्येष्ट व्रुध्दांचा प्रश्न तर डोळ्यातुन पाणीच काढायला लावतो.शहरी जीवनातील संकल्पना,आपले स्वत:चे नखरे,खाण्याच्या सवयी,स्वामित्वाची भावना,आपणच वाढवलेल्या आपल्या गरजा ह्या सगळ्यांची जाणीव पुस्तक वाचताना सारखी होत राहते.परिक्रमेत शारीर तसेच मानसीक सुद्रुढतेच्या कमाल पातळ्यांचा कस लागणार्या बर्याच घटना पुस्तकात वर्णीलेल्या आहेत.
परिक्रमेने काय मिळाले याचा विचार करताना आपले विचार,आचार आणी आपल्या जबाबदार्यांची जाणीव,निसर्गाचे जवळुन झालेले दर्शन अन त्यामुळे सम्रुध्द झालेले भावविश्व.आणी आपला कमी झालेला गंड या सर्वांचे शब्दचित्रण लेखिका आपल्यापर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झाली आहे.
पुस्तकं 'खाण्याचं' खूळ !
१४ वर्षांपूर्वी
२ टिप्पण्या:
khoop chhan parichay karun dilay pustakacha. avashya vachen.
धन्यवाद क्रांती.तुझा ब्लॉग पण खुप छान आहे.
टिप्पणी पोस्ट करा